शरदराव,

माझ्या मनात बरेच दिवस खदखदत असणारा विषयच तुम्ही काढला आहे. (कदाचित हे थोडं विषयांतरही असेल!)

सद्दाम हा क्रूरकर्मा होता की नव्हता या वादात पडायचं नाहीये (तो विषयच नाहीये); पण ऐन सणांच्या दिवसांत (नाताळ/ईद) त्याला फाशी देणं आणि त्यातूनही त्याचा जीव कसा जातोय हे जगभर दूरदर्शनवर दाखवणं हे मला अत्यंत हीन आणि घृणास्पद वृत्तीनं केलेलं कृत्य वाटलं. मला आज एकानं इ-संदेशातूनही त्याची चित्रफीत पाठवली!

हे केल्यामुळे सद्दाम (गुन्हेगार असला तर उगाचच) कित्येकांच्या लेखी हुतात्मा झालाय.

कित्येक जण त्यामुळे अमेरिका आणि ख्रिश्चनविरोधीही झाले असतील!

जगातल्या वाईट प्रवृत्तींचा नाश कायद्याच्या, प्रसंगी युद्धाच्या मार्गानं जरूर करावा; पण त्यातून जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी; द्वेष वाढावा यासाठी नव्हे.

मला भारताचा इतिहास आठवला - रामानं रावणावर रीतसर अंत्यसंस्कार करवले; शिवाजी महाराजांनी अफझल खानाची कबर बांधली, ...

आपली संस्कृती अशी 'घाऊक' देश / वंश / धर्मविरोधी नाही किंवा 'घाऊक' विरोध निर्माण करायचा प्रयत्न करत नाही हे मला जाणवलं आणि अभिमानही वाटला.

- कुमार