'पिपांत मेले' ही कविता १९४६ च्या दरम्यानची. मर्ढेकरांचा कालखंड लक्षात घेता ही कविता त्यांच्या सुरवातीच्या कवितांपैकी म्हणता येईल. त्यामुळे मर्ढेकरी पर्वाची सुरवात म्हणून या कवितांकडे पाहिले जात असावे. अर्थात हा माझा अंदाज.
ओंकार,
आपले वाचन अतिशय डोळस दिसते. आपण इतक्या तत्परतेने समर्पक आणि संयुक्तिक असे उतारे शोधून ते कष्ट घेऊन येथे टंकित केलेत याबद्दल आपले आभार.
आपण म्हणता तशी पिपात मेले ही कविता त्यांची सुरुवातीची म्हणूनच 'ट्रेंड सेटर' पायंडा पाडणारी अशा अर्थाने उल्लेखिली जात असावी.
आपण इतक्या तत्परतेने अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिलेत आणि मी मात्र त्याची दखल घ्यायला इतका विलंब लावला याबद्दल मी अतिशय दिलगीर आहे. मला मनोगतावर येऊन वाचन-लेखन करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे असे झाले. क्षमस्व.
या चर्चेत कविते सोबतच गद्य लेखनातील बदलांवर सुद्धा कोणी प्रकाश टाकावा अशी विनंती करतो.
आपलाच,
--लिखाळ.