नमस्कार,

आपले तीनही लेख आताच एका बैठकीत वाचून काढले. अतिशय सुंदर.

जगण्यासाठी व्यवहार कुणालाही चुकत नाही. पण देवाच्या कृपेने, इथे व्यवहार व्यवसायासारखा चालत नाही.

हे वाक्य कायम स्मरणात राहील. ते तुमच्या मनावर सुद्धा कोरले गेले असेल म्हणूनच ते इतक्या अचूकतेने तुम्ही अनेक वर्षांनंतर सुद्धा आठवू शकलात असे वाटले.

मी खाँ साहेबांना पूर्वी कधीतरी एकदाच एका कार्यक्रमात पाहिले आहे. (बहुधा भास्कर चंदावरकर यांनी त्यांचे गुरू बाबा अल्लाउद्दीनखाँ साहेबांचा जीवनपट मनोहर मंगल कार्यालयात दाखवला होता. त्यावेळी मी त्यांना तेथे पाहिले असे वाटते आहे.) तेव्हा त्यांच्या कडे पाहूनच ते अतिशय साधे आणि सत् शील असणार असे जाणवले होते. आज आपले लेख वाचून खात्रीच पटली.

लेख वाचून अतिशय आनंद वाटला. वरील प्रतिसादात अत्त्यानंद म्हणतात, अशा तऱ्हेच्या व्यक्ती समाजात आहेत म्हणूनच समाजव्यवस्था टिकून आहे असे प्रकर्षाने वाटते  याच्याशी मी सहमत आहे.

--लिखाळ.