आभास,

अगदी दिगम्भा म्हणाले तसेच वाटते आहे. अप्रतिम हृदयस्पर्शी अनुभवलेखन !

हृदयाने विचार करणारी दोन माणसं गुरुशिष्य नात्यात गुंफली गेली की भावभावनांचा कसा सुंदर गोफ विणला जातो याचं एक मूर्तिमंत उदाहरणच वाचायला मिळालं.

असेच मनमोकळे बहारदार लेखन वाचत रहायला मिळण्याहून जास्त आनंददायी दुसरे असे ते काय असणार? पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा. तुमचा पुढचा लेख लवकरच मनोगतावर झळको, हीच अपेक्षा.