लिखाळबुवा,
(पहा कसे होते ते. उर्दू साहित्याचा इतका सहवास आहे त्यामुळे आपल्याला शब्द व त्यांचे अर्थ चांगले कळतात असा आपला गोड समज असतो, तो अर्थ नेमकेपणाने सांगायला गेलो की असा डळमळीत होतो. असो. सांगायचा प्रयत्न करतो.)
बाद (स्त्रीलिंगी) म्हणजे हवेची मंद झुळूक, कुठून कशी येते कळत नाही पण सुखावते, शांतवते, आनंद देते. (आपण नंतर या अर्थाने नेहमी "बाद" म्हणतो तो शब्द खरा ब'अद, म्हणजे शे'र, शम'अ प्रमाणे ऐन हे अक्षर समाविष्ट करणारा आहे. मागे एकदा मृत्यूनंतर या अर्थाने बादे-मौत असा चुकीचा शब्दप्रयोग मी केला होता, तेव्हा बाद चा खरा अर्थ कळल्यावर खजील व्हावे लागले त्याची आठवण झाली.)
सबा (स्त्रीलिंगी) म्हणजे सकाळी येणारी हवा. खरे म्हणजे हे दोन्ही शब्द काहीसे ओव्हरलॅप होणारे आहेत, पण तरी असा शब्दप्रयोग आहे खरा.
एकूण बादे-सबा म्हणजे सकाळी येणाऱी हवेची मंद झुळूक.

आणि पूर्वेकडून येणाऱ्या हवेला पुरवा, पुरवैया असे म्हणतात.
पण सबा व पुरवा या एकच असतात की नाही हे मात्र मला खात्रीलायक माहीत नाही. माहीतगारांनी सांगावे.
दिगम्भा