इंदिराजीच्या काळापासून सद्दाम हुसेन भारताचे मित्र होते. मित्रत्वाचे नाते त्यांनी तोंडदाखले पणाने न निभावता सदैव भारताला पाठिंबा देत निभावले.
राजकीय गुन्हेगार व आतंकवादी ह्यांत गल्लत केली जात आहे. एखाद्या तात्या टोपेला किंवा सावरकरला इंग्रज राजकीय गुन्हेगार ठरवत फासावर चढवतीलही परंतू त्यांना आतंकवादी कसे म्हणता येईल.
जर मी / आम्ही भगतसिंग, तात्या टोपे किंवा सावरकरांना देशभक्त म्हणून संबोधतो तर सद्दामच्या काही समर्थकांना ते देशभक्तच वाटणार. अर्थात आपल्याकडेही भगतसिंगांना/सावरकरांना शिव्या घालणारे "महात्मा" व "पंडित" आहेतच की !........
कित्येक जण बुशला आजच्या जगातला सर्वात मोठा (व्हाईट कॉलर्ड) आतंकवादी समजतातच ना ?
कोणाचे काय मत असावे हा व्यक्तिगत प्रश्न असतो परंतु त्याने इतिहास कसा बदलता येईल हे नाही कळले.
श्री.सद्दाम हुसेन हे भारताचे सच्चे मित्र होते व त्याबद्दल मीही बरेच काही वाचले / ऐकले आहे. ह्या पार्श्वभूमीवर एका राजकीय गुन्हेगाराला घाईघाईत फाशी देण्याचा निर्णय सर्वथा संशयास्पदच वाटतो.
ह्या चे दूरगामी परिणाम काय होतील ते होवो.... उद्या ह्याच मुद्द्यांवरून बुशची राजकीय हारही होऊ शकेल किंवा तो अजून उर्मटही होऊ शकेल परंतु जगातल्या मानवांच्या मनातले संशयाचे जळमटं तो कसे हटवू शकेल हेच आता बघायचे आहे.
श्री. सद्दाम हुसेन ह्यांना फासावर दिल्याचा मी निषेध करतो.
(हेच करणे सध्या शक्य आहे !)