तिथं आलेल्या काही 'पर्यटकांशी' चर्चा केली असता सिंहगड दूरदर्शन टॉवरसाठी प्रसिद्ध आहे... असं उत्तर मिळालं... शिवाजी महाराज, तानाजी वगैरे तर कोणाला ऐकूनही माहीत नव्हतं... :(

हे पटत नाही. परप्रांतीय लोकांना शिवजी, तानाजी, हिरकणी आणि सिंहगड कळावे म्हणून आपण काय केले?? हा सगळा इतिहास सांगणारा एक तरी फलक तिथे आहे का? किंवा तू ज्या लोकांना भेटलास त्यांना तू हा इतिहास सांगण्याचा कितपत प्रयत्न केलास?

आपल्याला इतर राजांबद्दल कितपत माहिती असते? म्हैसूर चा यादवाड, मदुराई चा तिरुमला, जयपूर चा सवाई माधवराव यांच्याबद्दल किती माहिती आहे मराठी माणसाला? पण हे सगळं तुम्हला त्या त्या स्थळांना भेट दिली कि कळू शकतं कारण तिथे तसे माहिती पुरवणारे फलक, गाईड आहेत.

नुसतंच जपलं पाहिजे जपलं पाहिजे असं दहा वेळा लिहून, १०० वेळा ओरडून काहिच होणार नाहिये.