मी सुद्धा नुकताच सिंहगडावर गेलो होतो. बहुतेक लोकांना आपण कशासाठी तेथे जात आहोत याबद्दल फारसा विचार करावासा वाटतच नसतो. ऐतिहासिक कारणासाठी तर नाहीच. शुद्ध हवा, खाली दिसणारे सुंदर दृष्य, डोंगर चढण्यातील मजा किंवा त्यात होणारा व्यायाम, एक वेगळी पिकनिक अशी कारणे असू शकतील. त्यातूनही स्नेहलताईंनी सुचवल्याप्रमाणे फलक लावले (ते सुद्धा मराठीसोबत हिंदी व इंग्रजीमधून) तर कुणीतरी निदान कुतूहलाने ते वाचण्याची शक्यता आहे.