जमिनीचे आणि व्यनिचे कडवे चांगले वाटले. शेवटचे कडवे नीट समजले नाही.

विषय आणि विचार हास्योत्पादक असले तरी प्रसिद्धीची घाई होऊन वृत्ताकडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. थोडा अधिक प्रयत्न करून खालील प्रमाणे बदल केलेत तर वृत्तात बसेल असे वाटते.

(अधिक चांगले करण्यासाठी माझ्या आवृत्तीतही  अनेक ठिकाणी असे तसे इथे तिथे असे अनावश्यक शब्द आले आहेत ते टाळता येतील. अर्थात अधिकार तुमचाच आहे.)

तुम्हा सांगतो प्रशासकाचेे असे वागणे असू नये
लिखाण त्याला माझे दिसते, इतरांना का दिसू नये?

शब्द वावगे काढूनी घे 'आपापसात' वा तू टाक
अंतरजाली विश्वामध्ये लिखाण कापत बसू नये

येईल आता जाग मालका होईल सगळे पूर्वीचे
नाजुक ऐश्या वेळी कोणी मनोगतींनी रुसू नये

मनोगतींना हसवतात हे विडंबकच अवली सारे
प्रशासकाच्या बडग्याला त्या आता कोणी हसू नये

ज्यास काळजी प्रतिसादाची, असतो तो लाचार खरा
टीका ज्याला असे नकोशी 'जमीन' त्याने कसू नये

वैर असो त्या निर्मात्याशी, वैर असो वा कवनांशी?
वार करावा थेट उरावर, व्यनिमधून तू डसू नये..

प्रशासकांची गाठ मजसवे लिखाणामुळे ह्या पडली
गोड बोलणे ऐकून त्याचे पुन्हा "केशवा" दिसू नये

चू.भू.द्या.घ्या.