आपण जर हेच शब्द सतत लेखनांत आणले म्हणजे ते तोंडी पाठ होतील व आपणच ते आपल्या भाषेत रूढ करू शकू.
ह्या बाबत एक गंमत आठवली ती अशी....
माझे मेहुणे (जे एम.टेक आहेत) नेहमी रेल्वेस्टेशनला स्थानक म्हणत तर प्लॅटफॉर्मला फलाट.... सुरुवातीला मला ते ऐकायला विचित्र वाटे परंतू हळू हळू सवयीने ते आता माझ्याही तोंडातही 'घट्ट' बसलेय ! 
अखेर कुठून न् कुठून तरी सुरुवात तर करावीच लागणार ना ?