सर्व तेरा प्रतिसाद वाचल्यानंतर असे दिसते की मेघना पेठे यांचे साहित्य वाचलेल्या कोणाही वाचकाचा प्रतिसाद त्यात नाही. फडके, ख़ांडेकरांची पुस्तके वाचून निर्माण झालेली माझ्या पिढीतील लोकांच्या मनातील मराठी वाचनाची आवड पु.ल.देशपांडे, रणजित देसाई यांची पुस्तके वाचण्यापर्यंत टिकली. फार फार तर द.मा.मिरासदार, रत्नाकर मतकरी वगैरे दोन चार नावे सांगता येतील, पण तेही आता जुने झाले. टेलीव्हिजन आल्यानंतरच्या काळात आलेल्या नवीन पिढीने, विशेषतः इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांनी, किती मराठी पुस्तकांचे वाचन केले असेल याबद्दल थोडी शंका वाटते.
मुक्तसुनीत यांनी अशी आवड जोपासली व उत्कृष्ट रसग्रहण करून मेघना पेठे या लेखिकेची ओळख करून दिली हे कौतुकास्पद आहे.
दिगम्भा यांनी "बादे सबा" चा अर्थ सांगितल्यामुळे एका जुन्या गाण्याचा अर्थ आता समजला. ते आहे "बहार बनके वो मुस्कुराये हमारे जीवनमें । बादे सबा तू न आये तो क्या।"