अभिनंदन, प्रसाद. सुंदर गझल. सारे शेर आवडले.त्यातही
रोजप्रमाणे रस्त्यावरती गाठ प्राक्तनाशी पडली
गोड बोलणे ऐकुन त्याचे आजतरी मी फसू नये...
अवचित येता जाग दिसावी रात अनावर पुनवेची
अशा पहाटे दुलई ओढुन प्राणसखीने रुसू नये!
हे दोन अधिक.
वैर तुझे निर्मात्याशी वा वैर तुझे या कवनांशी?
वार करावा थेट उरावर, अभिव्यक्तींना डसू नये..