आपण म्हणता ते ठीकच. पण अगदी परदेशात गेल्यावर सुद्धा आपण ज्या ठिकाणाला भेट देणार आहोत त्याची ऐतिहासीक/सामाजीक पार्श्वभूमी माहीत करून तेथे जाण्याची दक्षता घेता येते. मग ज्या लोकांची भाषा आपणाला सहज समजते अशा लोकांत राहताना तर प्रथमिक माहीती सहजच मिळत असते. असे असताना सुद्धा हा अडाणीपणा हे मला सुशिक्षीत आणि सुसंस्कृत माणसाचे लक्षण वाटत नाही. आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले-रणनीति यांची माहीती अमराठी प्रांतांत इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असतेच (असे ऐकून आहे:).