मुक्तसुनित,

आपण त्वरित शंकानिरसन केलेत या बद्दल आपले आभार.

कसोटीच्या प्रसंगी सामाजिक निती-नियमांऐवजी आपल्या आदिम प्रवृत्तींना धरून त्यांचे वागणे होते.

फारच सुंदर. या आदिम प्रवृत्ती अथवा सहजवृत्ती (इन्स्टींक्ट) लक्षात घेणे हा माझा आवडता उद्योग आहे :) या तऱ्हेने विचार करू जाता आसपासच्या घटना, लोकांचे वागणे वेगळेच भासू लागते हे खरेच आहे. कधीतरी वाटते की मूळ 'सामाजिक संकेत' हे या आदिम वृत्तींना धरूनच असतात. कालानुरूप त्यांची आवरणे पोकळ कवचांप्रमाणे शिल्लक तेवढी राहतात. ( म्हणजेच संकेताचा नियम बनतो :) 

आता अजून एक विनंती आहे. वावदूक म्हणजे काय ते स्पष्ट करावे. हा शब्द कशा रितीने वापरला जातो? मी प्रथमच ऐकला.

स्नेहेच्छू
--लिखाळ.