अव्याप्ती म्हणजे व्याख्या पूर्ण व्याप्त नसणे. (Too wide a definition). लक्षणाच्या तीन दोषांपैकी पहिला दोष.
अतिव्याप्ती म्हणजे नियमांखाली न येणाऱ्या गोष्टींना नियम लावणे. (Too narrow a definition)--दुसरा दोष.
तिसरा आठवत नाही.
व्याख्या एखाद्या विषयाचे व्यवच्छेदक लक्षण नसेल , म्हणजे अपुरी व्याख्या असेल तर अव्याप्तीचा दोष होतो. सर्व लक्षणे व्याख्येत आली नाहीत तर अव्याप्ती.
व्याख्या करताना ती इतर गोष्टींनाही लागू पडली तर अतिव्याप्ती.
उदाहरणार्थ:-अनेकदेवतावादी(Polytheism) धर्म म्हणजे हिन्दुधर्म ही व्याख्या. परन्तु काही हिन्दु एकच देव मानतात तर काही फक्त ब्रह्म. काही तर पूर्ण नास्तिक असतात. तरी हे सर्व हिन्दु असतात. त्यामुळे या व्याख्येत अव्याप्ती हा दोष आहे. याउलट, दया करुणा मानणारा धर्म म्हणजे हिन्दुधर्म. ह्या व्याख्येत अतिव्याप्ती आहे. कारण इतरही असे धर्म आहेत.
मला वाटते आपल्याला कल्पना स्पष्ट होईल.