गझल आवडली. सगळ्या द्विपदी छान आहेत.
मक्त्याबद्दल एक शंका आहे. आसवांना वाहण्याची एकदा संधी मिळाली का ? दु:खे जर नव्याने सोसली तर संधी पुन्हा मिळाली असे म्हणायला नको का? तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ मला कळला नसावा म्हणून विचारत आहे. मी लावलेल्या अर्थानुसार मला असा बदल सुचला :
आसवांना वाहण्याची लाभली संधी पुन्हा अन्/नव्याने
तीच ती दु:खे नव्याने सोसण्याची वेळ झाली