शीतल महाजन व सहकाऱ्यांचे कौतुक निश्चितच वाटते. तिचे धैर्य आणि धाडस अतुलनीय आहे तरी तिचा अभिमान वाटावा का याबाबत मी साशंक आहे.
शीतल, स्कॉट, आमुंडसेन, अमेलिया एरहार्ट यांच्या कष्टाबाबत आपल्याला नक्की काय आणि का वाटावे? ते हौशी वीर आहेत/ होते. त्यांनी जे काही केले ते स्वतःच्या खुशीसाठी केले. यात शीतलने समाजपयोगी किंवा इतरांसाठी असे काही केले का याबाबत शंका वाटते.
एखाद्याने दुर्दम्य परिस्थितीवर केलेली मात ही १००% कौतुकास्पद आहे मग ती शीतल महाजन असो की धीरुभाई अंबानी. त्यामुळे भारताचे नाव सर्वत्र झळकते/ झळकू शकते हे ही खरे. ते वाचले की मनाला बरे वाटते, पण शीतलचा अभिमान वाटत नाही. कौतुक वाटते.
अमेरिकेत आणि रशियात बातमी पोहचवणे हे मिडियाचे कर्तव्य. अर्थात ती तशी पोहोचली तर अमेरिका/ रशियाने नक्की काय करावे? म्हणजे एखाद्या कझाकिस्तानाच्या माणसाने नायग्रा धबधब्यावरून उडी मारली तर आपण भारतीय काय करणार याबाबत? आणि त्याबद्दल आपल्याला कझाकिस्तानचा आदर वाटावा की काय? फारतर आपण वृत्तपत्राच्या कोपऱ्यात बातमी टाकणार, ती जे वाचतील ते 'वा! काय धाडसी मनुष्य आहे' म्हणणार आणि विसरणार. अमेरिकन आणि रशियन बहुधा तेच करतील.
अशी धाडसे करणाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमाने मोठे केले तर ठीक नाहीतर अशा कितीजणांची नावे आपल्याला आठवतात?