अशा प्रकारच्या बातम्यांना मीडियातर्फे जी हाईप दिली जाते ती मला सुद्धा अवास्तव वाटते.

प्रत्येक गोष्टीचा समाजाला किती उपयोग होतो हा निकष  नेहमी लावता येत नाही. तसे केल्यास प्रसिद्धीच्या झोतात असणारे सर्व कलाकार, खेळाडू, गिर्यारोहक, मूलभूत शास्त्रावर संशोधनकार्य करणारे शास्त्रज्ञ वगैरे बहुतेक मंडळी  निरुपयोगी ठरतील. शीतलसारख्या लोकांनी केलेल्या कामातून अशक्यप्राय वाटणारे काम सुद्धा इच्छाशक्तीच्या बळावर करता येते हा संदेश मिळतो व त्यातून कुणाला तरी कांही तरी दिव्य करण्याची प्रेरणा मिळण्याची संभावना असते.