मी दोन्ही चित्रपट पाहिलेले आहेत (...व्हिनी ८-९ वेळा आणी काय... एकदा). काय...ची कथा ...व्हिनी वर आधारित असली तरी त्याचे मराठीकरण अगदी बेमालूमपणे केलेले आहे. ...व्हिनी पाहिलेला नसला तर कथेला विदेशी मूळ आहे हे लक्षात येणे कठीण आहे.
...व्हिनीतील राल्फ माचियो, मारिसा टोमेइ आणी ज्यो पेशी यांच्या अभिनयाला काय..मधील मकरंद अनासपुरे आणी कंपनीनी तोडीसतोड उचलून धरलेले आहे.
एकदोन गाणी व प्रसंग वगळता दिग्दर्शकमहाशयांनी बाजारुपणा घातलेला नाही!!
सुंदर चित्रपट (दोन्ही).