वर श्री. अभय नातू यांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही चित्रपट छानच आहेत.  कायद्याचे रूपांतर अतिशय सुरेख वठले आहे.  मला तो व्हिनी पेक्षा अधिक आवडला.  व्हिनी मध्ये शिवराळ भाषा उगीच जास्त प्रमाणात आहे.  तोतऱ्या वकिलाचा भाग कायद्याचे मध्ये जरा कमी प्रतीचा वाटला.

व्हिनी हा खूप जुना चित्रपट आहे.  इतक्या वर्षांनी असा चित्रपट हुडकून त्याचे रूपांतर करणे हे कौशल्याचे आहे.  परंतु असे रूपांतर केले आहे अशी प्रांजळ कबुली देणे अधिक योग्य झाले असते.

जर तुम्ही कायद्याचे पाहिला नसेल तर तो जरूर पाहिला पाहिजे.  किंबहुना त्याची तबकडी संग्रहात ठेवण्याजोगीच आहे.

कलोअ,
सुभाष