विकिपीडिया मराठीत लिहिताना कुठलीही शंका येऊ नये असे मला वाटते.
कारण: १)इंग्रजीत शेवटी आ हा उच्चार फ़क्त ahनेच होतो, उदा: Allah चा उच्चार अल्ला. २) मारिया, बल्गेरिया, रशिया वगैरेंचे अस्सल इंग्रजी उच्चार मारिअऽ, बल्गेरिअऽ, रशऽ असेच आहेत.मराठीत हे शब्द 'या'न्त लिहिले तरच भाषासुसंगत दिसतात. 'आ'न्त शब्द मराठीत नसावेत. असलेच तर ते 'या'न्त किंवा 'वा'न्त होतात. उदा: जिओ X /जियो\/; कौआ X/कौवा\/; बुवा वगैरे. ३) इंग्रजीत अतिशय मोठे शब्द सोडले तर सर्वसाधारण शब्दात एकच आघात असतो. अशा शब्दात बहुधा एकापेक्षा अधिक दीर्घ अक्षरे नसतात.विकिपीडियात 'पी' दीर्घ आहे त्यामुळे बाकीची सर्व ऱ्हस्व. ब्रिटिशांनी हे स्पेलिंग vikipaedia असे केले असते. ४) V चा उच्चार खालच्या ओठावर दात रोवून करायचा तर w मधील 'व'चा ओठांचा चंबू करून. ५) 'आय्'चा उच्चार नेहमी ऱ्हस्व 'इ' होतो. अपवाद:- इन्वलीड्(अपंग/अपंग करणे) ; परंतु इनव्हॅलिड(बेकायदेशीर,गैरलागू इत्यादी.) त्यामुळे विकिपीडिया हाच बरोबर उच्चार आहे. w असल्याने 'वि' ओठांचा चंबू करून म्हणायचा.