लेख आवडला. आपल्या सोप्या शब्द वापरण्याच्या शैलीमुळे समजायला सोपा गेला पण फक्त तेवढेच नाही. :)
गेले ३-४ दिवस मी पॅरासायकॉलॉजीवरील एक कादंबरी वाचत होते आणि त्यात हीच संकल्पना लिमलेटच्या गोळ्यांऐवजी नाण्याच्या कौलावर समजावून सांगितली होती. १० लिमलेटच्या गोळ्यांऐवजी १०० वेळा नाणे हवेत भिरकावले तर कितावेळा छाप व काटा येईल यावरून योगायोगाचे गणित शिकवले होते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण योगायोगाच्या कल्पनेवरून श्रद्धेबाबत भाष्य केले आहे, त्या पुस्तकात अंधश्रद्धेवर भाष्य आहे. अधिक सांगायचे झाले तर पुस्तकाचे नावच Superstition असे आहे. (तसा पुस्तकात फारसा 'राम' नाही, 'सॅम' आहे. [नायकाचे नाव]. विशेषतः '१५ पार्क ऍवेन्यू' चित्रपटासारखा शेवट असल्याने वाचकांना आपल्यापरीने अर्थ लावण्याचे नको तेवढे कष्ट घ्यावे लागतात. परंतु पॅरासायकॉलॉजी आणि कोइन्सिडन्सवर उत्तम विस्तार केलेला आहे.)
काल संध्याकाळी मी ही पुस्तक वाचून संपवले आणि आज सकाळी मनोगतावर हा लेख उघडला तेव्हा 'देजा वू'* या योगायोगाची प्रचीती आली. :-) देजा वू बद्दल बोलायचे झाले तर ७०% लोकांना याची प्रचीती येते असे मानले जाते.
असो. सुमारे ८००० मनोगतींपैकी किमान दोन मनोगती नकळत एकाच विषयावर विचार करत होत्या, हे योगायोगाचे गणित कसे सोडवायचे? :-)
प्रियाली
* पूर्वी काहीतरी पाहिलेले, वाचलेले याला देजा वूपेक्षा 'देजा वेकु' या देजा वूच्या प्रकाराने संबोधणे अधिक रास्त होईल.