चाळीसपैकी दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी असण्याची शक्यता टक्केवारी जवळजवळ ९०% हे बरोबर आहे.

प्रोबॅबिलिटी व 'निगेशनचा' नियम वापरुन हे सिद्ध करता येते.

दोन मुलांचा वाढदिवस एका दिवशी असण्याची शक्यता= १- (सगळ्या मुलांचा वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी असण्याची शक्यता.)

वर्गात फक्त दोन मुले आहेत असे समजू.
पहिल्या मुलाच्या वाढदिवसाची शक्यता= ३६५/३६५= १
दुसऱ्या मुलाचा वाढदिवस त्याच दिवशी नाही ह्याची शक्यता= ३६४/३६५
(पहिल्या मुलाचा वाढदिवसाची तारीख वगळून)
म्हणून दोन मुलांचा वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी असण्याची शक्यता
= (३६५/३६५) *(३६४/३६५)

तसेच दोन मुलांचा वाढदिवस एकाच दिवशी असण्याची शक्यता
= १- {(३६५/३६५)*(३६४/३६५)}

वर्गात तीन मुले आहेत असे समजले तर हीच शक्यता
= १- {(३६५/३६५)*(३६४/३६५)* (३६३/३६५)}

ह्याच नियमाने  चाळीस मुलांच्या वर्गात ही वाढदिवस एकाच दिवशी असण्याची शक्यता
= १- {(३६५/३६५)*(३६४/३६५)* (३६३/३६५)..........((३६५-३९)/३६५)}
=  १- ०.१०९
=८९.१% जवळजवळ ९०% असे म्हणता येईल.