मानतो मी, बेट होणे ठीक नाही
एकही सेतू दिसेना माणसांचा

अजगरांना टाळता येते इथे पण
ह्या जगी विळखा सुटेना माणसांचा

ठेवतो अस्थीकलश आम्ही सुरक्षित
(होय, आत्मा सापडेना माणसांचा)
सुरेख. सर्वच शेर आवडले.