(पुस्तकी वाटते) / (विचित्र वाटते)
आपला हा प्रयत्न म्हणजे एक प्रक्रिया आहे. त्यात पुस्तकी किंवा विचित्र असा कोणताही भाव मनात ठेवू नये. जोपर्यंत शब्द रुळत नाही अथवा समाजात स्वीकारला जात नाही तो पर्यंत ही प्रक्रिया चालूच ठेवावी लागणार आहे.
आताच थोडासा आरामगाडीने प्रवास करून आलो. त्यात धाब्यावर इंग्रजीमध्येच लिहिलेले "लेडीज टॉयलेट" असा शब्द वाचला. कोठे कोठे चक्क बाथरुम असेही आपण वाचत असतो.
आता माझ्या मते येथे प्रसाधन गृह, स्वच्छता गृह, नैसर्गिक विधी घर, फारतर मुतारीसाठी किंवा सरळ एखाद्या स्त्रीचे चित्र दाखवावे अथवा त्यापेक्षा एक गोलआकार त्यात दोन डोळे आणि वेणी दाखवली तरी कार्यभाग साधला जाऊ शकतो.
आपल्याला लेडीज टॉयलेट किंवा बाथरुम शब्द वाचताना वावगे वाटत नसेल तर मराठीत कोणताही शब्द वापरताना का बरे असे वाटावे?
शेवटी हा मुक्त प्रयत्न आहे, ज्यांना मराठीबद्दल कळकळ आहे, प्रेम आहे ते यातील शब्द नक्कीच वापरतील यात काय शंका?