शब्द, कल्पना, नाद, ओघ, लय ह्या सर्वांनी खुलून आलेली कविता.
वा!
(गजलेच्या पाऊलखूणा जागोजागी दिसतात. कविता म्हणून आम्हाला ही जास्त आवडेल.) आपण ह्या रचनेचे गजल असे वर्गीकरण केलेले नाही, तसे केले तरी चालेल असे आम्हाला वाटले, चू. भू. द्या. घ्या.

कविता म्हणूनच हिच्याकडे पहायचे असेल तर हे बदल पहा कसे वाटतात, अर्थात कविता आपली आहे, हा अधिकार आपला आहे.


थोड्या कळल्या मनमोराच्या वेड्या भाषा
तेंव्हा सगळ्या मधुस्पर्शांचे झाले गाणे
डोळ्यांमधल्या सुखस्वप्नांचे झाले गाणे
गालावरल्या स्मितरेखांचे झाले गाणे
>>ह्या ओळींमध्ये काही परस्परसंबंध दिसतो

मातीवरती थेंब जळाचे आले गेले
खोलामध्ये जिरलेल्यांचे झाले गाणे
चोचीने चोचीला देता चिमणाचारा
चिवचिवणाऱ्या आनंदांचे झाले गाणे
>>तसेच ह्या ओळींचेही.


खुंट्या पिळल्या जुळल्या तारा, आवाजाच्या,
देहामधल्या हरप्राणांचे झाले गाणे
>>ह्या ओळी पहिल्या कडव्यातही घेता येतील असे वाटले.

साऱ्या पडल्या सत्त्वपरीक्षा केंव्हा मागे
आता उरल्या नि:श्वासांचे  झाले गाणे

किंवा ह्या शेवटच्या चार ओळी एकमेकांशी जोडल्या तर एक अधिक सुंदर कविता करता येईल असे आम्हाला वाटले, आपण योग्य वाटेल तसे करा.