मी ही असा अथपासून इतिपर्यंत पिझ्झा घरी बनवते. काही अधिक सुचवण्या --
१. भाज्या अर्धवट शिजवून घेत नाही. पातळ चिरते. थोडीशी कुरकुरीत चवही छान लगते.
२. मोझरेला चीजप्रमाणेच बाजारात खास पिझ्झा चीजही मिळते. तसेच टॉमेटो सॉसऐवजी पिझ्झा सॉसही मिळतो तो वापरल्यास पिझ्झा अधिक चविष्ट लागतो. तसेच इटालियन मरिनारा सॉसही वापरता येईल. त्यामुळे वेगळे ऑरेगानो भुरभुरण्याची अर्थातच गरज भासणार नाही.
३. बरेचदा उरलेल्या भाज्या जसे पनीर माखनी, वेजिटेबल माखनवाला, नवरत्न कुर्मा अशा भाज्या पिझ्झा बेसवर पसरवून वरून चीज घालूनही खास भारतीय पद्धतीचा पिझ्झा बनवता येतो.