आपणांस लेखन लिहीण्यासाठी प्रवृत्त करणारा "शोर" नावाचा कोण्या मनोज कुमारचा चित्रपट होता हे काही थोडे नाही !
त्या काळी त्याचे चित्रपट चालत ! कारण करमणूक फक्त तीच होती....
आजही एकता कपूर च्या फालतू  सेरियल्स; तिच्या वडिलांच्या फालतू चित्रपटाप्रमाणे चालतातच आहेत ना !
स्नेहल नी म्हटल्या प्रमाणे 'झोपडी में चार पाई, मानुस बिना सुनी पडी' ह्या गीतांपेक्षा 'भारत ने मेरे भारत ने' हे गाणे ऐकणे मला तरी आवडेल !

माझ्या मते कोणी "शोर" वर कितीही आदळ-आपट केली, किंवा गोविंदाच्या "जोडी नंबर १" ला कितीही नावे ठेवली तरी त्या चित्रपटांनी "धंदा" करून ठेवला आहे.... 
आपले राष्ट्रगीत इंग्रजी उच्चारांत, काजोलच्या दात पडक्या पोराच्या तोंडून ऐकले, तरी  आपले हृदय उचंबळतेच !
तेथे मनोज कुमारच्या उपकारच्या "मेरे देश की धरती" की  क्या बात ?

मी मनोज कुमारचा चाहता वगैरे नाही परंतु शोर ची कहाणी आपण लेख वगैरे लिहून नाचक्की करण्याइतपत वाईट नक्कीच नव्हती.......
असो, आपणांस तसे वाटत असल्यास - ती तशी असावीच हे आता ३५ वर्षांनंतर पटतेय !
त्याच्या बाकी चित्रपटांबद्दलचे आपले रस-ग्रहण वाचायला नक्कीच आवडेल !