विवेचनात्मक रसग्रहण नंदन,
स्त्रियांच्या ३३% आरक्षणावर,
त्यांच्यात असलेल्या अ-स्रुरक्षित भावनांवर,
त्यावर केल्या जाणाऱ्या राजकारणावर,
त्यातून अडलेल्या-नाडलेल्या स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या सवलतींवर,
एखादीच तेजस्विनी तळपून उठते.....

सर्वांनी त्यावर उच्च पातळीवरून प्रयत्न केल्यासच कुठेतरी त्यांचे पडसाद दिसून येतील.
तेजस्विनी ही सर्वस्वी माझी, स्वत:ची कहाणी नव्हती;
हे मी लेखनाच्या प्रथम भागातल्या लांब लचक प्रस्तावनेत लिहीले होते.....

मी स्वतःला कविता महाजनांसारख्या लेखीकांशी जोडू पहात नाही....
परंतु ह्या समस्येवर सतत लेखन कुठेतरी प्रकाशीत होत राहील्यास नक्कीच समस्येचे समाधान मिळेल असे वाटते...
कविता महाजनांची पूर्ण कादंबरी वाचायला खचितच आवडेल;
असेही तेजस्विनीची उत्तरार्ध लिहीण्याची मागणी होत आहे तेव्हा त्यांच्या तोडीचे लेखन, येथे मनोगतावर, करण्यास मी प्रयत्नशील राहीन......!