गजल आवडली; सहजसुंदर आणि ओघवती आहे.
याच रदीफ़चे काही शेर (जमीन वेगळी)-
हे फुलांनो, उमलण्याची वेळ झाली
पाखरांच्या परतण्याची वेळ झाली...
चेहरा विद्रूप भासू लागला का?
आरशाला बदलण्याची वेळ झाली...(अजब)
सोसलेले काळजाने विसरण्याची वेळ झाली
पेटलेले हे निखारे विझवण्याची वेळ झाली...
सावलीला शाप आहे सांजवेळी पांगण्याचा
सूर्य अस्तावून जावा विनवण्याची वेळ झाली... (अशोक बागवे)