प्रियाली यांच्या प्रतिसादामध्ये असे वाक्य आहे.
"शीतल, स्कॉट, आमुंडसेन, अमेलिया एरहार्ट यांच्या कष्टाबाबत आपल्याला नक्की काय आणि का वाटावे? ते हौशी वीर आहेत/ होते. त्यांनी जे काही केले ते स्वतःच्या खुशीसाठी केले. यात शीतलने समाजपयोगी किंवा इतरांसाठी असे काही केले का याबाबत शंका वाटते."
यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना मी खालील वाक्य लिहिले आहे.
"प्रत्येक गोष्टीचा समाजाला किती उपयोग होतो हा निकष नेहमी लावता येत नाही. तसे केल्यास प्रसिद्धीच्या झोतात असणारे सर्व कलाकार, खेळाडू, गिर्यारोहक, मूलभूत शास्त्रावर संशोधनकार्य करणारे शास्त्रज्ञ वगैरे बहुतेक मंडळी निरुपयोगी ठरतील."
त्यामुळे "प्रसिद्धीच्या झोतात असणारे सर्व कलाकार, खेळाडू, गिर्यारोहक, मूलभूत शास्त्रावर संशोधनकार्य करणारे शास्त्रज्ञ वगैरे बहुतेक मंडळी निरुपयोगी ठरतील." हे माझे मत नाही हे स्पष्ट आहे.
ही सर्व मंडळी स्वतःच्या खुशीसाठी काम करीत असली तरीही ती अप्रत्यक्षपणे समाजोपयोगी काम करतात असेच मला वाटते. कृष्णविवर किंवा फ्यूजनवर काम करणारे संशोधक त्या कामाचा आजच्या समाजाला काय फायदा होतो हे सांगू शकत नाहीत, तरीही त्यांच्या मागे प्रसिद्धीचे वलय असते कारण समाजाला त्यांचे कार्य महत्त्वाचे वाटते.