:-) या भावचिन्हाचा अर्थ याहू मेसेंजरमध्ये मला सापडला नाही. हे चिन्ह आपणच बनवले आहे कां?

नाही, मी नाही बनवले. याहू मेसेंजरमध्ये नक्कीच सापडायला हवे होते. happy हे असे, परंतु त्याला तेथे नाक नसावे, केवळ :) असे असावे.  चिन्ह स्मितहास्य दाखवते. जे आपला लेख वाचताना 'देजा वू' योगायोगाच्या साम्यामुळे माझ्या चेहऱ्यावर उमटले. असो.

विविध विचारांची संख्या अनंत असली तरी मनोगताशी बांधून ठेवले गेलेल्या मनोगतींच्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये साम्य असण्याची मोठी शक्यता आहे असे कुठलीही आंकडमोड न करता म्हणता येईल.

हो केवळ मनोगतच नाही, विशेषतः मनुष्यसंख्या लक्षात घेता जगात दोन व्यक्ती एकच विचार करणे, एकच काम करणे, अगदी कार्यालयात, विद्यापीठात एकच कल्पनाविस्तार करणारे, अगदी एकासारखे उत्तरपत्रिका सोडवणारे किंवा एकाच संकल्पनेवर चित्रपट बनवणारे (अर्थात यासर्व ठिकाणी वेळ सारखी) वगैरे वगैरे. अर्थात मलाही यासाठी एखादे गणित अस्तित्वात आहे असे वाटत नाही.

माझे वाचन आपल्याप्रमाणे विस्तृत नाही. मनोगतावरील एका लेखात आलेल्या 'विलक्षण योगायोग' या शब्दप्रयोगावरून मला हा लेख लिहिण्याची बुद्धी झाली.

विस्तृत वाचनाचा प्रश्न नाही, कादंबरी त्यातील संकल्पना वगळता टुकार होती. पण तिच वाचायची इच्छा व्हावी, त्यात असेच गणित दिलेले असावे आणि त्याचा पाठपुरावा करून आपल्या लेखाच्या आदल्याच दिवशी मी २३ विद्यार्थांचा हा दुवा शोधून वाचावा व एक्सेलमध्ये सोडवावा याला योगायोग म्हणायला हरकत नाही.(वरील प्रतिसादात दुवा देणे राहिले होते, आता हा दावा काहींना पटत नसल्याचे लक्षात आल्याने आता गृहितकाच्या पुष्टीदाखल तो दुवा ही देणे सयुक्तिक वाटते.)

http://www.getsmarter.org/mstv/R3_a.cfm

असो. आपल्याला लेख लिहावेसे का वाटले हे चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात आलेलेच आहे. अशा योगायोगांत विलक्षण काहीही नसते, अगदी सारखे विचार करण्याच्याही.