पोळीचे 'स्टिल लाइफ' सुंदर आहे. पोळी आणि पार्श्वभूमीचा टॉवेल यांची रंगसंगती छान जमून गेली आहे.

सिमलामसाला आणि कुड्यांची चित्रेसुद्धा चांगली उतरली आहेत.

थालीपीठदेखील आवडले. डिश थोडी मोठी झाली काय? तसेच हलकी सजावट केल्यास चित्रे अधिक चविष्ट होतील. रव्याच्या लाडवांवर आणि आसपास थोडा सुका मेवा पखरल्यास कसे?