श्रीयुत यादगार यांचे माहितीसाठी मी नम्रपणे सांगू इच्छितो की:-
जगातील कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही. अमेरिकेमध्ये जगातील सर्व देशातून माणसे आलेली आहेत. ही सर्वजण आपापल्या घरी त्यांची मातृभाषा बोलतात. या भाषांची संख्या शेकड्यात मोजावी लागेल. त्यांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही. चीन/जपानमध्ये आपले प्रतिनिधी असतात. ते त्या देशात स्थायिक नसतात. त्यांच्या मुलांना कोणीही मातृभाषेतून शिक्षण देत नाही. आपल्या देशातसुद्धा केंद्र सरकारच्या नोकरीतल्या अधिकाऱ्यांची दर दोन/तीन वर्षांनी बदली होते. माझ्या वडिलांच्या ४२ वर्षात २८ बदल्या झाल्या. कराची, लाहोर, पेशावर, क्वेट्टा पासून ते बंगलोर, सिकन्दराबाद, डाक्का, अगरतला पर्यंत. अशांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळणे दुरापास्त असते. शिक्षणाचे माध्यम कुठलेही असले तरी ज्ञानामध्ये काहीही फरक पडत नाही. घरी बोलत असतील तर मुलांचा मातृभाषेशी संबंध रहातो आणि वेळ पडल्यास मातृभाषेतून ते लेखन-वाचन करू शकतात..
मातृभाषेतून शिक्षण सक्तीचे करणे ही आपल्या अडाणी राजकारण्यांच्या डोक्यातील कल्पना आहे. कलकत्यामध्ये अजूनही फ़्रेंच माध्यमाच्या शाळा आहेत. त्या शाळेत देशी आणि परदेशी दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात.