मर्ढेकरांच्या कवितेसाठी शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता हे काव्यसंग्रह वाचनीय आहेत.

मर्ढेकरांची कविता हा एकत्रित काव्यसंग्रहसुद्धा जरूर वाचावा.  विलास सारंग (अरूण कोलाटकरांची कविता)व गो.वि. करंदीकर (परंपरा आणि नवता) ही पुस्तकेही वाचनीय आहेत.

मराठी नवकवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे कवि मर्ढेकर ह्यांच्या कवितात मुख्यत:  सद्य परिस्थितीर कोरडे ओढणारा सूर, निराशा, माणसाची अगतीकता, परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका अशाप्रकारचे विषय हाताळले गेले आहेत. त्यांना आधुनिक कवी म्हणायचे की वास्तवतावादी कवी ह्यात समीक्षकात दुमत आहे.
आमच्या मते मर्ढेकरांच्या कवितेत सामाजिक भाव आढळतात  तरी वास्तववादापेक्षा निराशेचा सूर अधिक आहे. अभंग, ओवी, पादाकुलक अशी वृत्ते, काही संस्कृतप्रचूर शब्द ह्यांचा समावेश असला तरी रोमॅंटिसिझम त्यांच्या कवितेत पहिला संग्रह वगळता आढळत नाही.
नव्या विचारांना आपल्या कवितेत स्थान देण्याची आधुनिकता त्यात जास्त आहे, पण वास्तवाकडे बघण्याची दृष्टीच साशंकतेची आहे. म्हणून ते वास्तववादी नाहीत तर काही वेगळे करण्याच्या आधुनिक विचारांचे आहेत असे म्हणावे लागेल.

 काव्यभाषा आणि काव्यरूप याबाबत मर्ढेकरांनी सतत प्रयोगशीलता दाखवली आहे. नवे शब्द, नव्या कल्पना, नवी प्रतीके, यांचा वापर सढळहस्ते केला आहे. ह्यातच त्यांचे आधुनिक असणे सामावले आहे. तरीही त्यांचे वर्गीकरण आधुनिकतावादी किंवा वास्तववादीच असे एकाप्रकारे करता येत नाही.


मर्ढेकरांना भोवतालचे विश्व अमानुष, विद्रुप दिसते. त्यांच्या भावविश्वात आशावाद, भावनात्मकता, एकात्मता ह्यांना थारा नाही. परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल इतर कविंप्रमाणे ते सुद्धा साशंक आहेत.
आमच्या मते मर्ढेकरांच्या कवितेत एका दुंभगलेल्या मनाचा शोध अधिक वेळा घेतलेला आहे असे दिसते.

एक्ला असून । मनी दोन झालोआता मात्र भ्यालो। मला मीच

हे ह्याचे उदाहरण आहे.

तरीहि येतो वास फुलांना ही कविता-

तरीहि येतो वास फुलांना
तरीहि माती लाला चमकते
खुरट्या बुंध्यावरी चढीन
तरीहि बकरी पाला खाते
अस्मानावर भगवा रंग
आणि नागवे समोर पोर
तरीहि डुलक्या घेत मोजते
ह्या दोहोंतील अंतर ढोर