मुळात उपास नक्की कश्यासाठी करतात? आरोग्यपूर्ण आहार (हेल्दी डायट) म्हणून की सांस्कृतिक, धार्मिक रूढी म्हणून? हल्ली आपण उपासाकडे आहारातील बदल म्हणून बघतो. पण असे बघणारे लोक तसेही देवाला प्रसन्न करण्यासाठी उपास करीत नाहीत असे मला वाटते.