मंदाक्रांता जमले आहे, ह्याच वृत्तात आणखी इतर विषय/विचार वाचायला अधिक आवडतील. ही कविता वाचून विशेष काही वाचले असे वाटले नाही.  
वासुदेवशास्त्री खरे ह्यांच्या जन्मभूमि नावाच्या कवितेत हेच वृत्त आहे.

जेथे माझे जनन घडले पूर्वपुण्येच थोर
जेथे गेले दिवस असता बाळ, सौख्यात फार
जेथे होते करित वसती पुर्वज प्रेमभावे
का त्या भूमीप्रति चिर न म्या पूज्यभावे स्मरावे?

वृत्तबद्ध काव्य जर वास्तवाला धरून / वर्तमान काळाचे संदर्भ घेऊन केले असेल तर अधिक प्रभावी वाटते असे आम्हाला वाटते.

जन्मभूमि ही कविता आज वाचली तर त्यात फार काही आहे असे वाटत नाही, पण स्थळाकाळाचा संदर्भ लक्षात घेता काहींना ते विचार  महत्त्वाचे वाटू शकतील.

मूळ शब्द सई असा आहे की सय? त्याचे अनेकवचन करताना काय होईल?