आहे अटळ, मनुष्या, उतरंड रौरवाची
काही मरून गेले, काही जिवंत गेले

मक्ता आवडला.

मतला अधिक स्पष्ट करून सांगता येईल का? उमलून वांझ ह्याचा निर्देश प्रौढ कुमारिकेकडे आहे का?

(खालील प्रतिसाद देऊन आम्ही जिवंतपणी नरकात जाणार असे दिसते,महानरकात)

हा प्रतिसाद केवळ आपल्या ह्याच गज़लेला उद्देशून आहे असे नाही.  आपल्या व इतरांच्या काही गज़लांना सुद्धा आम्ही असे मत देऊ इच्छितो.  ते इथेच लिहितो आहे त्याबद्दल क्षमस्व.

गज़ल समजायला सोपी असावी, रूढार्थ चटकन समजावा, गूढार्थ समजणे वाचकाच्या 'जाणतेपणावर' असावे असे आमचे मत आहे.  जर रूढार्थ समजायला अवघड असेल तर आम्ही गज़लेत दूर्बोधता आहे असे मानतो.

 एखादा शब्द समजला नाही शेराचा अर्थ समजत नाही. तसेच एखाद्या प्रतिकात्मक संदर्भाचेही आहे. आपल्या लेखनात  शब्द आणि प्रतीकांचा सढळ हस्ते उपयोग दिसतो.  ही प्रशंसनीय गोष्ट आहे.  शब्दकळा आणि वाचन नाही म्हणून शेराचा रूढार्थ ही समजत नसेल तर तो शेर वाचकाच्या मते फसला आहे असे अनुमान आम्ही काढतो. ते टाळता आले तर उत्तम.
गज़लेतील काही शेर फक्त काही ठराविक वाचकांसाठी आपण लिहित आहात असे असेल तर तो आपला निर्णय आहे. शेवटी सगळ्या वाचकांची विविध क्षेत्रातील माहिती आणि समज सारखी असणार नाही हे कटू सत्य आहे.