माधवराव,
आपला लेख 'लक्षपूर्वक' वाचला फार बारकाईने निरिक्षण करून आपण अनेक मुद्दे मांडले आहेत. संवादाचे अनेक पैलू जे माहित असून जाणवलेले नसतात ते आपल्या लेखातून समोर येत आहेत.
कित्येकदा आपण काही गोष्टी जून्या / त्याच त्याच व्किंवा निरूपयोगी आहेत असे समजून आपण कानाआड करतो
या बाबतीत मला एक गोष्ट आठवली. मी आणि माझे एक आजोबा दोघेही पक्षीमित्र आहोत. आम्ही रानात एकत्र पक्षी पहायला जायचो. तेव्हा सुरुवातीला मी बुलबुल सारखा नेहमीचा पक्षी दूरवर दिसला तर त्याकडे दूर्लक्ष करायचो. तर आजोबा दूर्बीण लावून खात्री करून घ्यायचे. तेव्हा त्यांनी मला हा महत्त्वाच धडा दिला होता की, 'नेहमीचा पक्षी आहे अशी अटकळ बांधून दुर्लक्ष करणे योग्य नाही. एखादे वेळेला बुलबुलच्या धाटणीचा पण आपण कधीच पूर्वी न पाहिलेला पक्षी असेल तर त्याला पाहण्याच्या आनंदाला तू मुकशील.' संवादांच्या बाबतीतही हे तितकेच खरे आहे.
--लिखाळ.