कोणत्या शब्दासोबत कोणता शब्द यावा याचे काही नियम नसले तरी संकेत असतात असं मला वाटतं. माझे एक स्नेही ह्या प्रकाराला 'शब्दमैत्री' म्हणतात. ही शब्दमैत्री विचारात घेऊन लेखन केलं तर त्याचं सौंदर्य वाढतं असं मला वाटतं. (इथेही सुंदरता कानाला चांगलं वाटणार नाही!) --मीरा फाटक.
मीरा फाटक यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. एकाच अर्थाचे दोन शब्द असले तरी वापरण्याचे संकेत असतात.
उदाहरणार्थ शोक आणि दुःख यांचे अर्थ एकच असले तरी त्यांचा वापर वेगवेगळ्या प्रसंगी होतो.