आपले लिखाण वाचुन खरच भाराउन गेलो. मी अमेरिकेला आलो त्या दिवसांची आठवण झाली. नुकताच मी अमेरिकेला आलो आहे, त्यामुळे आठवणी अगदी नवीनच आहेत. ऑफिस मधुन जेव्हा जायचे नक्की झाले त्या दिवशी मी घरी सांगितले. बायकोला आधी खुप आनंद झाला, पण जेव्हा सांगितले कि फक्त मलाच जयचे आहे, त्या वेळचा चेहरा अजुन आठवतो.
मग काय झाली, तयारी चालु. हळु हळु जायचा दिवस जवळ येत होता. आणि अखेर तो दिवस जवळ आलाच. मी सकाळ पासुनच उदास होतो. एकिकडे जावेसे वाटत नव्हते पण जावे लागनार होते तेही आई, वडिल, बायको आणि मुलाला सोडुन. क्षणभर विचार केला खरच जावे का नाही, आणि माझी ही घालमेल बायकोला कळत होती. मग तिनेच धीर दिला. आई कडे बघायचे तर मी सकाळ पासुन टाळत होतो. तीच्या मानात काय चालले आहे हे मि जाणत होतो.
फ्लाईट मध्यरात्री असल्यामुळे मी, माझे वडिल आणि सासरे आम्ही तिघेच मुंबईला निघालो. खर सांगायच तर मि मुद्दामच बाकीच्यांना बरोबर घेतली नाही. कारण एकतर मुलगा लाहान असल्यामुळे त्याचे हाल नकोत आणि माझाही पाय निघाला नसता नंतर.
विमानात बसयची पहिलिच वेळ असल्यामुळे जरा भीतिच होती मनात. सगळा रस्ताभर मि उदासच होतो. अनि अखेर आम्हि एअर पोर्टवर पोहोचलो. आता इथुन पुढे मला एकट्यालाच जावे लागणाऱ होते. मी निघतो म्हणुन वडिलांना नमस्कार केला आणि त्यांनी मला चक्क मीठीच मारली. टचकन डोळ्यात पाणी तरळले. अशिच मीठी त्यांनी मला अगोदर मारली होती जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा. पण आज त्यांच्या डोळ्यातही पाणी होते. पण ते आनंद आसु होते. आज त्यांचे कष्टाचे चीज झाले होते आणि आज त्यांचे पिलु खरेच गगनात भरारी घेउन साता समुद्रापार जाणार होते.
मी मागे वळुन पहात पहातच चेक इन कडे वळलो.
आमित