वा वा केशवा. क्या बात है! मक्ता तर अगदी वास्तवदर्शी उतरला आहे. मनोगती कवी-गझलकारांची सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहे :
सोसू कसा तयाच्या आसूड लेखणीचा
असहाय होउनी ते फटकार पाहतो मी
टाकू मनोगतावर कैसी गझल अता मी
त्या बोचऱ्या टिकेचा भडिमार पाहतो मी
भलतीच केशवाची दहशत मनोगतींना
भयग्रस्तसे कवी ते चहुवार पाहतो मी
टाकेल 'खोडसाळा' फुलटॉस कोण त्याला
दररोज केशवाचे षटकार पाहतो मी!!