वास्तवाचे अस्तित्व नाकारणे म्हणजे अंधश्रद्धा दूर करणे नाही. -- १००% मान्य.
उत्तर पाकिस्तानातील व्यक्तींमध्ये ही क्षमता असणे हा त्यांच्या शरीरातील, अन्नातील काही रासायनिक द्रव्यांचा किंवा प्रक्रियांचा भाग असू शकेल. अनेक व्यक्तींची प्रतिकार क्षमता किंवा healing power ही इतर अनेक व्यक्तींपेक्षा अधिक असू शकते. परंतु हे सर्व त्या त्या व्यक्तीपुरते मर्यादित आहे. भानुदासचे वेगळेपण हे यासारखे नाही. एखाद्या व्यक्तीने मी योगसाधना केल्याने माझे मन शांत आणि उल्हासित होते हे सांगणे वेगळे आणि मी योगसाधना केल्याने माझ्यासमोर बसलेल्यांचे मन शांत आणि उल्हासित होते हे सांगणे वेगळे. भानुदासचे वेगळेपण इतर गोष्टींवर प्रक्षे्पित होत आहे. परीकथेतील मायडस (मिडास) राजासारखे.
हा लेख वाचून काही प्रश्न पडले.
अर्थात, जर कोणतेही प्रयोग न करता अंधश्रद्धा निर्मूलन समिती या प्रकरणाला थोतांड म्हणत असेल तर हेच प्रश्न त्यांनाही थोड्याफार फरकाने लागू होतात.
या लेखात लक्षात आलेली एक मजेशीर गोष्ट म्हणजे भानुदाससाठी वापरलेले "साधा" हे विशेषण. साधी माणसे इतरांना कधीच फसवू शकत नाहीत असे मानणे हे अंधश्रद्धेचे लक्षण नाही काय?
प्रियाली.