संजोपजी,

'दे दान सुटे गिराण' म्हणत भिकारणीने फिरावे तसे 'कैसा जादू डाला रे' असे आर्त सूर लावणाऱ्यांचा जमाना आहे. 'मस्ती' सारख्या चित्रपटाला विनोदी चित्रपट म्हणण्याचा जमाना आहे. पण अशातच कधीकधी दिल्लीच्या शांत रेस्टॉरंटमध्ये कॉफी आणि टूटीफ्ऱूटी खाणारे, एकमेकाच्या प्रेमात आकंठ बुडालेले एखादे जोडपे आठवते.

आपण लिहिले आहे ते अगदी खरे आहे. परवाच मी अमोल पालेकर, विद्या सिन्हाचा "छोटी छोटीसी बात" बघत होते. त्यावेळी मलाही अगदी असेच वाटले. अगदी सामान्य माणसाची गोष्ट घेउन त्यात किती सुंदर रंग भरता येतात याची ही उत्तम उदाहरणे आहेत. मनोरंजनामधे बिभत्सता का लागते हल्ली? असे काही जूने दर्जेदार सिनेमे पाहील्यावर मला प्रश्न पडतो की ही माणके सोडून लोक संजय दत्तचे हॉलीवूड स्टाईल (पण ओकारी आणणारे) सिनेमे लोक (... इन्क्लुडिंग माझा नवरा!...) का बघतात? (हो, आदल्याच दिवशी संजय दत्तचा झिंदा अगदी अर्धा तासही बघवला नव्हता मला. तसाच कांटे) हे असे ओंगळवाणे थ्रिलर्स माझ्या ताकदीबाहेरचे आहेत.

थोडेसे विषयांतर झाले. पण मन मोकळे केल्याशिवाय राहवले नाही. असो - सई परांजपेंचा कथाही मला असाच आवडतो. त्यातही दीप्ती नवल, फ़ारुख शेख आणि नसीरुद्दीनची टीम जमली आहे. "अंगूठा छाप" ही आता फारसा आठवत नाही, पण त्यावेळी खूप आवडला होता.

-(प्रभावित) सीमा