करू इच्छीतो.....
मागे कोणीतरी पाण्यात टाकलेल्या वनस्पतीं पासून पेट्रोल बनवण्याचा प्रयोग वाजत गाजत सादर केला होता, हा गृहस्थ (आता नांव आठवत नाही) त्यानंतर कुठे गेला ते सर्वसामान्यांना कळलेच नाही.
२००६ च्या शेवटी म्हणजे सप्टे नंतर "कॉंबो फ्युएल" वर - (हायड्रोजन व पेट्रोल मिश्रीत) चालणाऱ्या गाड्यांच्या जाहिराती व त्यावरील माहिती शुक्रवारच्या टाईम्स च्या ड्राइव्ह पुरवणीत यायला लागल्या - तेव्हा त्या गृहस्थाची अचानक आठवण झाली.
आमचा अगदी जवळचा नातेवाईक कुटूंबासमवेत गेल्या सात आठ वर्षापासून अमेरिकेत बेपत्ता आहे. कुणाला म्हणजे कुणालाच त्याच्या अस्तित्त्वाची काहीच कल्पना नाही. हा गृहस्थ भाभा अणुसंज्ञान संस्थेतून मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती पत्करून अमेरिकेला नोकरी व संशोधन निमीत्ताने गेला होता. दिड दोन वर्षात कुटूंबियांनाही त्याने तेथे बोलावून घेतले होते.
हळदीची व कडूनिंबाची सुप्रसिद्ध लढाई डोक्यातून काही करता जात नाही......
कोणाला ह्यांत पादरामायाणाचा संबंध वाटेल पण काही बाबींचे स्पष्टीकरण काळाच्या ओघानेच पुढे येते हे मात्र खरे !