तुमच्या खास शैलीत लिहिलेला लेख वाचून चित्रपटाची मनात पुन्हा उजळणी करता आली त्याबद्दल धन्यवाद. कहाँसे आये बदरा हे कोणत्या चित्रपटातले आहे हे मी विसरले होते. ते तुमच्या लेखाने (विनासायास) समजले.
नायक नायिका नेहमीच्या उपाहारगृहात जातात पण त्यांचे तेव्हा काही तरी भांडण झालेले असते. नेहमीप्रमाणे वेटरला 'गरम क्या है?' असे विचारल्यावर तो 'मौसम!' असे उत्तर देतो.
हा प्रसंग ह्याच चित्रपटातला आहे न? (माझा घोटाळाही होत असेल. चू.भू.द्या. घ्या.)