वा संजोपराव, लै दिवसांनी तबियतदार लिखाण वाचायला मिळाले तुमच्याकडून! मजा आ गया. या चित्रपटाचे संगीत हा सुद्धा विशेष उल्लेख करावा असा विषय आहे. कै. राज कमल यांनी येसुदास आणि हेमंती शुक्ल (आमच्या आडनाव भगिनी म्हणून विशेष अभिमान!) कडून कहासे आये बदरा आणि काली घोडी द्वार खडी ही दोन अप्रतिम गाणी दिली आहेत. या चित्रपटासारखीच ती सुद्धा कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही.

चष्म-ए-बद-दूर म्हणजे बुरी नजर तुमसे दूर रहे (चष्म = नजर, बद = वाईट) म्हणजेच कुणाची दृष्ट न लागो.