सदर लेखकाचे विचार एकांगी (बायस्ड) वाटतात.  

आपल्याकडील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ हा जडवाद आणि नास्तिकवादाच्या प्रचाराचा एक भाग आहे. समाज सुधारण्याचा त्याचा काडीचाही संबंध नाही.

अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीमध्ये काही उणीवा/ त्रुटी/ कमतरता नक्कीच आहेत. परंतु समाज सुधारण्याचा काडीचाही संबध नाही असे छातीठोक विधान सदर लेखकाची बायस्ड विचारसरणी विशद करतात.

आज देवावरील अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानावरील फाजील श्रद्धेमुळे समाजाचे अधिक नुकसान होत आहे. खरा विज्ञानवाद जोपासायचा असेल तर, असल्या फाजील अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांना समाजाने दूर ठेवणे जास्त योग्य.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यावर आधीच इथं बराच उहापोह झाला आहे. त्यात आता ह्या नविन 'फाजील श्रद्धेची भर पडली आहे. फाजील श्रद्धा म्हणजे नक्की काय?

'अंधश्रद्धा निर्मुलन चळवळ' खेड्यापाड्यात अजूनही रुढ असणाऱ्या जुनाट अंधश्रद्धांचे निर्मुलन करण्यास अत्यंत आवश्यक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. कधी कधी(बऱ्यचदाही) त्यांचा तोल घसरतो आणि काही हौशी मंडळी 'अणू चे सुद्धा फोटो काढले गेले आहेत' वगैरे दावे करतात परंतु म्हणून सरसकट त्यांचा समाज सुधारणेशी काहीही संबंध नाही हे म्हणणे अतिरेकी वाटते. माझा स्वतःचा कट्टर हिंदुत्व वादाला विरोध आहे परंतु त्यामूळे शाखा चालवत असणाऱ्या उपक्रमांचा (जसेकी एकल विद्यालय) समाज  सुधारणेशी काहीही संबंध नाही असे मी कधीही म्हणणार नाही.

वास्तवामध्ये धर्म विज्ञानाच्या आड येत नाही किंवा विज्ञान धर्माच्या आड नाही.

गॅलिलीओ सारख्या शास्त्रज्ञांना तुरुंगात आलेले मरण, 'धर्म' हा विज्ञानाच्या आड येतो हे दाखवण्यास पुरेसे नाही का?