वांगी हिरवीच हवीत.
त्यात आमची खानदेशी (काट्याची) असल्यास उत्कृष्ठच !
त्या कृष्णा काठच्या वांग्यांना आमच्या तापी काठच्या वांग्यासारखी चव येत नाही ;)
गुळ, लिंबाचा रस व ओला नारळ हे समस्त महाराष्ट्र एकत्र झाल्यासारखे वाटते !
झणझणीत हवी असल्यास गुळ व ओला नारळ न टाकता -
ओल्या नारळाऐवजी सुक्या खोबऱ्याचा कीस टाकावा अशी सुचना करावीशी वाटते.
ओल्या नारळाने भाजीला एकप्रकारचा गोडवा येतो पण सुक्या खोबऱ्याने नारळाची चव येऊनही भाजी गोड लागत नाही.
कुकरचा शॉर्टकट आवडला परंतु पॅन मध्ये केल्यास चव अजून छान लागते. (झाकण ठेवून वाफेवर शिजवावी)
बाकी सर्व पद्धती सारख्याच आहेत.
ह्या प्रतिसादात शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केल्याचे कोणास वाटेल परंतु ही भाजी मला अत्यंत आवडते म्हणून लेखनाचा कंटाळा करीत येथेच प्रतिसाद देवून कृती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.