डोस देण्याची हिंमत करतो:)

तुझ्या अंतरी आज ओसंडणारा
ऋतू ओळखाया उखाणे कशाला
वाव्वा!
जरी सोस आहे मला चांदण्याचा
तुझे पौर्णिमेचे बहाणे कशाला
फारच मस्त!
शहाणे आणि मतलाही आवडला. शिळे आंबलेले तराणे कशाला... :):) सुराला कृपेचे घराणे वगैरे ठीक. म्हणजे लोकांना उदात्त भारी वाटू शकतो. उषेची निशाणे अर्धवट, धूसर. डोस देणे कळीला कशाला? कळीवर कीटकनाशकांचा फवारा कशाला असे कदाचित कवयित्रीला म्हणायचे असावे.
असो. गझल गुणदोषांसकट फार आवडली. सेच लिहीत राहावे.